लग्न आणि समारंभ म्हटलं तर मराठी संस्कृतीत उखाणे (Marathi Ukhane) घेतलेच जातात. आजकाल तर पुरुषांनाही उखाणे घ्यायला सांगतात. पण बायकांची तर सुटकाच होत नाही. एखादी आजी बाईला अथवा तरुण मुलीला पकडून जबरदस्ती उखाणा घ्यायला लावते. तेव्हा बिचार्या मॉडर्न सूनेची गोची होते. मात्र आमच्या वाचकांची अशी गोची होऊ नये म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही उखाणे घेऊन आलो आहोत. (Marathi Ukhane)
हे उखाणे (Marathi Ukhane) तुम्ही save करुन ठेवू शकता, पाठ करुन ठेवू शकता, जेणेकरुन ऐन वेळी पंचाईत होणार नाही. तर वाचकांनो, आता आपण पाहुया मराठी उखाणे: (Marathi Ukhane)
(हेही वाचा – Priyanka Gandhi : प्रियंका गांधी राहुल गांधींवर नाराज)
उखाणे बायकांसाठी
१) कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
__ रावांचे नांव घेते, सारे जण बसा”
२) मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
__ रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.
३) शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकून,
___ रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखून.
४) गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
__ रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
५) गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
__ रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
६) आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
___ चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
७) सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
_रावांचे नाव घेते ___ची सून.
८) शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
__ रावांचे नाव घेते आपल्या शब्दांकरिता.
९) सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
___ रावांसोबत केली नवीन आयुष्याची सुरुवात.
१०) राम मंदिर बांधायला कारागीर होते कुशल
__ चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. (Marathi Ukhane)
(हेही वाचा – BMC : किरण दिघावकर आणि विश्वास मोटे यांच्यावर उपायुक्तपदाची जबाबदारी)
उखाणे पुरुषांसाठी
१) साखरेचे पोते सुई ने उसवले,
__ ने मला डोळा मारुन फसवले.
२) संध्याकाळी म्हणतो मी शिवबाची आरती
___ माझ्या जीवनाची सारथी.
३) देवळाला खरी शोभा कळसा ने येते
__ मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
४) इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..
___ मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी..
५) दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते…
__च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते…
६) बेचव लाईफ झाली टेस्टी, प्रेम आयुष्यात आल्यावर…
__ माझा रिमोट कंट्रोल, तिने आणलंय मला थार्यावर…
७) सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
___आहे, माझ्या Life चा Server
८) तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल…
____माझी बायको आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!
९) माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा…
ती सोबत असल्यावर, टेन्शर सारे विसरा…
१०) सावरकरांचा भक्त मी, मनोभावे वंदन
__ मुळे झाले, माझ्या संसाराचे नंदन. (Marathi Ukhane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community