गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहेत. भर उन्हाळ्यात देखील अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. त्यामुळे उन्हाचा पारा देखील उंचावला आहे. अशातच मराठवाडा विभागात गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे वीज पडून दहा जणांचा मृत्यू
मराठवाडा विभागात गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह (Unseasonal Rain) गारपीट, अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे तब्बल १५३ गावांत नुकसान झाले आहे. तसेच ८ हजार हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर वीज पडून दहा जणांचा मृत्यू झाला असून १४७ जनावरे, ११७८ कोंबड्या दगावल्या आहे. तसेच एकूण ५४ घरांची पडझड झाल्याची माहिती विभागीय प्रशासनाकडून मिळाली आहे.
(हेही वाचा –Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचे संकट! शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान)
आठ जिल्ह्यांतील एकूण १० सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांतील एकूण १० सर्कलमध्ये अतिवृष्टीची (Unseasonal Rain) नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामधील लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोरोल येथे १३५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हेही पहा –
अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान
१. अवकाळी पावसात (Unseasonal Rain)वीज पडून १० जणांचा मृत्यू झाला आहे.
२. अवकाळी पावसात ६४ लहान, ८३ मोठी जनावरे आणि ११७८ कोंबड्या दगावल्या आहेत.
३. ५४ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.
४. अवकाळी पावसात एका घराचे पूर्णतः नुकसान झाले असून ६ झोपड्या आणि १ गोठ्याचे नुकसान झाले आहे.
५. लातूर जिल्ह्यात २६ ते २८ एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामध्ये २९ पशुधनाचे नुकसान झाले आहे. २० कोंबड्याही दगावल्या आहेत.
Join Our WhatsApp Community