कोरोनानंतर ‘या’ व्हायरसने वाढवली चिंता, जाणून घ्या कोणती आहेत लक्षणं

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावातून देश सावरत असून अद्याप कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झाला नाही. अशातच देशाची चिंता वाढवणारा व्हायरस आल्याचे सांगितले जात आहे. कोरोनामुळे जगातील बहुतांश देशांना आर्थिक फटका बसला. त्यानंतर कुठे आता नागरिकांचे जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता मारबर्ग या नव्या व्हायरसने अनेक देशांची चिंता पुन्हा वाढवल्याचे दिसतेय. तर या व्हायरसबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही अलर्ट जारी केला आहे.

(हेही वाचा – सर्वसामान्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ पदार्थांवर लागणार नाही जीएसटी)

दरम्यान, मारबर्ग व्हायरसबाबत त्वरित खबरदारी न घेतल्यास या व्हायरसच्या संसर्गामुळे परिस्थिती अनियंत्रित होऊ शकते, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

ही आहेत मारबर्ग व्हायरसची लक्षणे

या नव्या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव जसे की लघवी, लाळ, घाम, विष्ठा, उलटी इत्यादींच्या संपर्कात आल्याने याचा संपर्क पसरू शकतो. याशिवाय लागण झालेल्या व्यक्तीचे कपडे आणि अंथरून वापरल्याने मारबर्गचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरसने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिण्यासाठी २ ते २१ दिवस लागतात. मारबर्ग व्हायरसची लागण झाल्यावर खालील लक्षणे दिसतात

  • ताप येणे
  • थंडी वाजणे
  • डोकेदुखी
  • मायल्जिया यासारखे लक्षणे संक्रमित रूग्णामध्ये दिसू शकतात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here