१६ मार्च : National Vaccination Day; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

34
१६ मार्च : National Vaccination Day; जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

दरवर्षी १६ मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day) म्हणून साजरा केला जातो. १९९५ मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. वाचकहो, जगभरात पसरलेल्या कोरोना संसर्गाला निष्क्रिय करण्यासाठी अनेक देशांमध्ये लस दिल्या गेल्या. अनेक गंभीर आजार आणि विषाणू नष्ट करण्यासाठी किंवा निष्प्रभ करण्यासाठी लसींचा वापर केला जात आहे. लस ही जीवनदायी आहे आणि म्हणूनच आपण हा दिवस साजरा करतो.

(हेही वाचा – स्फोटाने Pakistan हादरलं ! BLAच्या हल्ल्यात 90 पाकिस्तानी सैनिक ठार)

दरवर्षी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन (National Vaccination Day) साजरा केला जातो. १६ मार्च १९९५ रोजी देशात पहिल्यांदाच जीवनरक्षक पोलिओ लसीकरण देण्यात आले. राष्ट्रीय लसीकरण दिन हा भारत सरकारच्या पोलिओ निर्मूलन कार्यक्रम पल्स पोलिओचा जणू एक उत्सव आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना पोलिओ लसीचे दोन थेंब देण्यात येतात. दो बुंद जिंदगी के ही जाहिरात खूप गाजली होती. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश लोकांना लसींबद्दल जागरूक करणे आणि त्यांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करणे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडते किंवा कोणत्याही संसर्गाने ग्रस्त होते तेव्हा डॉक्टर तिला तात्काळ आराम मिळावा म्हणून लस देतात. हेच लसीचं वैशिष्ट्य आहे.

(हेही वाचा – Amritsar Temple Grenade Attack ची CBI चौकशी करावी ; भाजपाच्या ‘या’ नेत्याची मागणी !)

२०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त घोषित करण्यात आले. गेल्या काही दशकांमध्ये, टिटॅनस, पोलिओ, टीबी सारख्या धोकादायक आणि अत्यंत घातक आजारांशी लढण्यासाठी लसीकरण हे एक अविभाज्य साधन बनले आहे आणि याद्वारे लाखो लोकांचे जीव वाचवले गेले आहेत. भारतात गेल्या २ दशकांपासून लोकांना मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येत आहे. आपल्या देशाच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यात लसींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून आला आहे. युनिसेफच्या मते, आपला देश २०१४ मध्ये पोलिओ मुक्त झाला आणि २०१५ मध्ये माता आणि नवजात शिशु धनुर्वात मुक्त झाला. (National Vaccination Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.