मुंबईची सुरक्षा रामभरोसे! कुठे गेली मार्क्समॅन पोलीस वाहने

दहशतवादी संघटनांच्या नेहमी निशाण्यावर असणाऱ्या मुंबई शहराची सुरक्षा रामभरोसे आहे, त्याचे कारण म्हणजे २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी आणण्यात आलेली ‘मार्क्समॅन’ वाहने त्याच बरोबर ‘कॉम्बेक्ट’ वाहने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन परिवहन विभागात धूळ खात पडून आहेत. २६/११च्या हल्ल्यानंतर प्रत्येक महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी दिसणारी ही वाहने मुंबईच्या रस्त्यावर नसल्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर दिसेनाशी झाल्यामुळे मुंबईकरांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे.

(हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

मुंबईवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार त्याच बरोबर केंद्र सरकारने मुंबईच्या सुरक्षेसाठी भराभर पाऊले उचलत मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम करण्यासाठी आधुनिक बोटी घेण्यात आल्या. पाण्यात आणि वेळ पडल्यास जमिनीवरही धावण्याची क्षमता असलेल्या चार ‘सिलेग’ बोटी खरेदी करण्यात आल्या होत्या, मात्र, वर्षभराने त्या वारंवार बिघडू लागल्या. न्यूझीलंडच्या कंपनीत या बोटी तयार करण्यात आल्याने त्यांचे सुटे भाग मिळत नव्हते. परदेशी बनावटीची वाहने आणि बोटी दुरुस्ती अभावी ‘सिलेग’ बोटी सन २०१६ मध्ये भंगारात काढण्यात आल्या.

२६/११च्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी महेंद्र कंपनीच्या अत्याधुनिक बुलेटप्रूफ मार्क्समॅन वाहनांची खरेदी करण्यात आली होती, त्याच बरोबर कॉम्बेक्ट वाहने ही प्रत्येक रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली होती. या वाहनावर सशस्त्र पोलीस तैनात होती.

मार्क्समॅन वाहने तसेच कॉम्बेक्ट वाहने मुंबईच्या रस्त्यावर दिसेनाशी

रेल्वे स्थानके, चित्रपटगृहे, मॉल, शहरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे, महत्वाचे ठिकाणे या ठिकाणची सुरक्षा तसेच दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात देण्यात आलेली मार्क्समॅन वाहने सशस्त्र पोलिसांसह तैनात करण्यात आलेली होती. ही मार्क्समॅन वाहने तसेच कॉम्बेक्ट वाहने मुंबईच्या रस्त्यावर दिसेनाशी झाली आहेत. काही मार्क्समॅन वाहने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन परिवहन विभागात धूळ खात पडलेल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या ताफ्यात जवळपास २० ते २५ मार्क्समॅन वाहने आहेत, त्यापैकी दक्षिण मुंबईत महत्वाच्या ठिकाणी ही वाहने तैनात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांनी दिली. काही मार्क्समॅन वाहने बिघडली असून ती मोटार वाहन विभागात रिपेअरिंगसाठी आणण्यात आलेली असून या वाहनांचे रिपेअरिंगचे काम सुरू असल्याचे असे मोटार पोलीस वाहन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here