कारगीलमध्ये पराक्रम गाजवणारे हुतात्मा Captain Manoj Kumar Pandey

208
कारगीलमध्ये पराक्रम गाजवणारे हुतात्मा Captain Manoj Kumar Pandey

कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धात धाडसी वृत्तीने लष्कराचे नेतृत्व केले. ते ११ व्या गोरखा रायफल्स मधील पहिल्या बटालियनचे अधिकारी होते. मनोज कुमार यांचा जन्म २५ जून १९७५ रोजी उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील रुधा गावात झाला. (Captain Manoj Kumar Pandey)

त्यांना लहानपणापासूनच खेळात रस होता. विशेषतः बॉक्सिंग आणि बॉडी बिल्डिंग हे त्यांचे आवडते खेळ होते. १९९० मध्ये उत्तर प्रदेश संचालनालयाच्या NCC कनिष्ठ विभागातील सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून ९० व्या अभ्यासक्रमात पदवीधर झाले. मनोज यांची नियुक्ती ७ जून १९९७ मध्ये ११व्या गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून करण्यात आली. (Captain Manoj Kumar Pandey)

(हेही वाचा – Parliament Session : अधिवेशनाचा पहिला दिवस घोषणांनी गाजला)

पुढे कारगिलमधील गार्कोन आर्यन व्हॅली गावात खालुबर हिल्सच्या बंकर टेकडीच्या काठावर लढाईत त्यांचा मृत्यू झाला. मे महिन्यात कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरी झाल्याची माहिती मिळाली होती. १/११ गोरखा रायफल्स बटालियनने सियाचीन ग्लेशियरमध्ये दीड वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. या बटालियनला कारगिलमधील बटालिक सेक्टरमध्ये जाण्यास सांगण्यात आले. (Captain Manoj Kumar Pandey)

कर्नल ललित राय यांच्या नेतृत्वाखालील या युनिटला जुबर, कुकरथाम आणि खालुबार भागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि त्यांचे बटालियन मुख्यालय येल्डोर येथे होते. या बटालियनमध्ये पांडे देखील होते. त्यांनी प्रचंड पराक्रम गाजवला. मात्र द्रास खोरे सुरक्षित करताना मनोज पांडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शौर्यासाठी भारत सरकारने मरणोत्तर परमवीर चक्र देऊन त्यांचा सन्मान केला. (Captain Manoj Kumar Pandey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.