- ऋजुता लुकतुके
मारुती सुझुकी (Maruti Swift 2024) कंपनीची हॅचबॅक श्रेणीतील एक लोकप्रिय कार म्हणजे मारुती स्विफ्ट. या गाडीचं नवीन २०२४ व्हर्जन सध्या युरोपात गाजतंय. ऑक्टोबर २०२३ मध्ये जपान मोबिलिटी शोमध्ये (Mobility Show) पहिल्यांदा ही कार जगासमोर आणल्यावर कंपनीने ती सगळ्यात आधी युरोपात लाँच केली होती. पण, आता भारतातील उत्पादनानेही जोर धरला असून गाडी भारतात येण्याची तयारी पूर्ण होत आली आहे. नवीन गाडीचा आकारही मोठा आहे. आणि सुविधाही आधुनिक आहेत. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- Mahindra XUV300 2024 : महिंद्रा एक्सयुव्ही गाडीचं उत्पादन सुरू, काही दिवसांत होणार लाँच )
भारतात येणारं मॉडेल हे फ्रंट व्हील ड्राईव्ह असेल. शिवाय नवीन गाडीत चालकाच्या सुरक्षेसाठी नवीन एडीएएस यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे चालकाने मार्गिका बदलल्यास, रस्त्याच्या कडेला गाडी आल्यास स्वयंचलित यंत्रणा चालकाला इशारा देईल. गाडीत ब्लाईंड स्पॉट (blind spot) प्रणाली आहे. आणि रस्त्यावरील रहदारीची चिन्हं ही गाडी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे समजू शकेल. रेअर व्ह्यू कॅमेरा आणि पार्किंग सेन्सरही इथं बसवण्यात आलेत. (Maruti Swift 2024)
2024 Maruti Swift Top Variant Walkaround – Gets ADAS, 90 Kg Heavier Than Before https://t.co/0yyKqBKId5 pic.twitter.com/mieBTVWeEA
— RushLane (@rushlane) January 31, 2024
वायरलेस यंत्रणेनं तुमचा स्मार्टफोनही तुम्ही गाडीतील यंत्रणेला जोडू शकाल. महत्त्वाचं म्हणजे नवीन स्विफ्ट गाडीसाठी कंपनीने ३ सिलिंडरचं पेट्रोल इंजिन विकसित केलं आहे. कमाल ८२ बीएचपी इतकी ऊर्जा हे इंजिन निर्माण करू शकेल. म्हणजेच आधीच्या गाडीच्या तुलनेत इथं सुधारणा करण्यात आली आहे. शिवाय ही गाडी हायब्रीड पर्यायातही उपलब्ध होईल. हायब्रीड गाडीत १० एएच क्षमतेची लिथिअम बॅटरी बसवण्यात आली आहे. (Maruti Swift 2024)
(हेही वाचा- ‘Secular’ शब्द घटनेतून काढून टाकावा: VHP ची मागणी)
आकर्षक रंग ही स्विफ्ट गाडीची ओळख आहे. आताही ८ मेटालिक रंगांत ही गाडी उपलब्ध होणार आहे. भारतात या गाडीची किंमत साडे सहा लाख रुपयांपासून सुरू होऊन १० लाखांपर्यंत असेल. (Maruti Swift 2024)