हल्लीच्या पिढीतल्या तरुणांना पैसे कमावण्यासाठी घाम गाळायलाच हवा अशी काही अट नाही. लखपती होण्यासाठी घराबाहेर सुद्धा पडण्याची गरज नाही. अगदी घरबसल्या सोशल मीडियाच्या साहाय्याने लखपती होता येते. त्यासाठी तुमचे युट्यूब चॅनल तुम्ही सुरू करायला हवे. मग त्यावर व्हिडीओ आणि रिल्स टाकून तुम्ही जगभरातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. जसजसे तुमचे सबस्क्रायबर वाढतील, तुमच्या व्हिडीओ आणि रिल्सना व्ह्यूज मिळतील तसतसे तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सतरा वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगणार आहोत.
हा मुलगा एक गेमर आहे. तो ऑनलाईन व्हिडीओ गेम खेळून लखपती झाला आहे. हा मुलगा आपण कमावलेल्या उपयोग स्वतःच्या अभ्यासासाठी आणि आवडीच्या गोष्टी करण्यासाठी करतो. याची महत्वाची बाब म्हणजे त्याचे आई-वडील त्याला ऑनलाईन व्हिडीओ गेम्स खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. होय, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. कारण भारतात सहसा असे घडणे कठीणच वाटते. पण ही घटना भारतातली नसून इंग्लंड येथील आहे. हल्ली सोशल मीडियावर या सतरा वर्षाच्या लखपती मुलाची गोष्ट व्हायरल होत आहे. इंग्लंडमध्ये राहणारा मॅसन ब्रिस्टॉ नावाचा हा मुलगा ऑनलाईन व्हिडीओ गेम्स खेळून लखपती झालेला आहे. आता तर त्याचे आई बाबा सुद्धा त्याच्या या ऑनलाईन गेम खेळण्याच्या पॅशनला पाठिंबा देत आहेत. या मुलाला गेमिंग मध्येच आपलं करिअर करण्याची इच्छा आहे.
(हेही वाचा – अजित पवार राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष; शरद पवारांची हकालपट्टी)
मेट्रो युकेच्या रिपोर्टनुसार सतरा वर्षाच्या या मुलाचे नाव मॅसन ब्रिस्टॉ आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याने रेक रूम नावाचा एक निःशुल्क ऑनलाईन मल्टिप्लेअर गेम खेळून १७,००० पौंड म्हणजेच जवळजवळ १८,००,००० लाख रुपयांची मोठी रक्कम कमावली आहे. या गेममध्ये खेळाडू व्हर्च्युअल रूम बनवू शकतात आणि जगभरातील अनेक खेळाडू यांच्यासोबत जोडले जाऊ शकतात. मेसन जगभरातील गेमर्ससाठी कंटेंट तयार करण्याचे काम करतो. व्हिडीओ गेममधून कमावलेल्या पैशांचा सदुपयोग मेसन आपल्या शिक्षणाची फी भरण्यासाठी तसेच स्वतःसाठी आवडीच्या वस्तू घेण्यासाठी करतो. यासाठी त्याचे आई-वडिलांचा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community