चीनमधील कारखान्यात भीषण आग; ३६ जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी

मध्य चीनमधील हेनान प्रांतात एका कारखान्याला लागलेल्या आगीत सुमारे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. एनयांग शहरातील एका कारखान्यात ही घटना घडली. चिनी प्रसारमाध्यमांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत, तर 2 जणांची ओळख पटलेली नाही. ही आग सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लागली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक तास मेहनत घ्यावी लागली. तसेच, 200 हून अधिक कर्मचारी आणि सुमारे 60 अग्निशमन दल याच्या मदतकार्यात सहभागी झाले होते. माहितीनुसार, एनयांग शहरातील हाय-टेक झोन कैक्सिंडा ट्रेडिंग कंपनी लिमिटेडमध्ये ही आग लागली.

( हेही वाचा: हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराणी फूटबाॅलपटूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; व्हिडीओ होतोय व्हायरल )

जखमींची प्रकृती स्थीर

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी 63 गाड्या पाठवल्या होत्या. रात्री 8 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. तर रात्री 11 वाजेपर्यंत पूर्णपणे विझवण्यात आली. या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून, दोघांना किरकोळ दुखापत झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींची प्रकृती सध्या ठीक असल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here