झारखंडमधील इमारतीला भीषण आग; 14 जणांचा मृत्यू तर 12 गंभीर जखमी

झारखंडमधील धनबाद येथे भीषण आगीची घटना समोर आली आहे. धनबाद येथील आशीर्वाद या इमारतीत आग लागली आहे. इमारतीच्या तिस-या मजल्यावर लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

धनबाद येथील मोड पोलीस ठाणे परिसरात शक्ती मंदिराजवळ आशीर्वाद ही इमारत आहे. सायंकाळच्या सुमारास या इमारतीत भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

( हेही वाचा: आंगणेवाडी जत्रेला येणाऱ्या लाखो भाविकांची ‘नो- मोबाईल नेटवर्क’पासून सुटका! प्रशासनाकडून विशेष सुविधा )

इमारतीत लग्न कार्य सुरु होते

पोलीस अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले, इमारतीत लग्न कार्य सुरु होते. पण, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती संजीव कुमार यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here