औरंगाबादमधील ‘चटाई’ कंपनीला भीषण आग

प्रातिनिधीक छायाचित्र

औंरगाबादमधील (Aurangabad) वाळूज महानगर (Waluj Mahanagar)  परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या चटाई (Chatai) नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे मोठमोठे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले आहेत. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या एका चटाई कंपनीला काही वेळापूर्वी आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी चालू होती. तसेच, कंपनीतील काही कामगार देखील कामावर आले असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व कामगारांना बाहेर काढण्यात यश  आले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. परंतु आगीचे प्रमाण अधिक आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

( हेही वाचा: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परिक्षेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here