नाशिकमध्ये फर्निचर मॉल आणि गोडाऊनला भीषण आग

129

नाशिक जिल्ह्यातील वडनेर दुमाळ रोडवरील एम.के. फर्निचर मॉल आणि गोडाऊनला गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा माल जळून खाक झाला. घटनेच्या वेळी मॉल आणि गोडाऊनमध्ये झोपलेल्या 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या घटनेत गोदाम आणि मॉल शेजारील चार-पाच घरे आणि काही वाहने जळून खाक झाली. नाशिक पोलीस ठाण्याचे पथक आगीच्या कारणाचा तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी फर्निचर मॉल आणि गोडाऊनमध्ये सुमारे 20 कामगार झोपले होते. आग लागल्याचे समजताच सर्वजण तत्काळ मॉल आणि गोदामातून बाहेर पडले. यासोबतच मॉलच्या शेजारील घरांमधून सर्व लोकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

( हेही वाचा: पुन्हा तिच नदी तेच शहर; ४३ वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण! काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या… )

कारण अद्याप अस्पष्ट

आगीने भीषण रूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या आगीत एम.के. फर्निचर मॉल आणि गोडाऊन जळून खाक झाले आहे. आगीमुळे मॉलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.