मध्यप्रदेशच्या रुग्णालयात भीषण अग्नितांडव, 10 जणांचा होरपळून मृत्यू

मध्यप्रदेशच्या जबलपूर शहरात एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहे. मृतकांमध्ये बहुतांशी रुग्णालयातील कर्माचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

जबलपूर शहरातील दमोह नाका शिवनगर येथील न्यू लाइफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज, सोमवारी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. आगीचे कारण समजू शकले नाही. आग आटोक्यात आणली असली तरी रुग्णालयात अनागोंदी आहे. दाखल झालेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे.

(हेही वाचा – बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी राज्यव्यापी मोहीम राबवा – फडणवीस)

या आगीत अर्धा डझनहून अधिक लोक होरपळले आहेत. आतापर्यंत रुग्णालयातून सुमारे 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या रुग्णालयामध्ये सुमारे 100 लोकांचा स्टाफ आहे. मात्र, एकूण मृतांचा आकडा किती असावा याबाबत साशंकता आहे. आता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here