पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत कारखान्याला भीषण आग

126

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीत एका कारखान्याला आज, मंगळवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. दूरवर या आगीचा डोंब दिसत असून परिसरात धूर पसरला आहे. घटनास्थळी पिंपरी फायर स्टेशन व प्राधिकरण फायर स्टेशनच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकुर्डीतील पांढारकर नगरमध्ये असणाऱ्या एका कारखान्यात भीषण आग लागली. हा कारखाना दाट नागरी वस्तीत असल्याने कारखान्याच्या एका बाजूला इंग्लिश शाळा तर दुसऱ्या बाजूला रेल्वे लाईन आणि दळवी नगर असा परिसर आहे.

(हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले, ‘इंदू मिलमधील स्मारक…’)

हा परिसर वर्दळीचा भाग असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समजू शकलेले नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.