महाराष्ट्र मिलिट्री स्कूल परीसरातील जंगलात भीषण वणवा, वन्यजीव सृष्टीची हानी

तळवली (बारागाव) ता. मुरबाड परीसरामधील जंगलात शनिवार दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी दुपारी दोनच्या सुमारास महाराष्ट्र मिलिट्री स्कूल येथे भीषण वणवा लागल्याचे समोर आले. या वणव्यात शेकडो एकर जमिनीवरील वन्यजीव सृष्टीची हानी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच अशा प्रकारचे वणवे नाणेघाट व माळशेजघाटाच्या परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात अज्ञात व्यक्ती, समूहाकडून कधी शिकारीच्या उद्देशाने तर कधी नकळतपणे लावले जातात. यावर वनविभागाकडून किंवा सरकारी यंत्रनेकडून आग विझविण्यासाठीची उपाययोजना वा वणवे लावणाऱ्या अज्ञाता विरुद्ध कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.

(हेही वाचा – कोकणात जाताना नो टेन्शन! उन्हाळी विशेष गाड्यांना २५ मे पर्यंत मुदतवाढ)

या वणव्यामुळे गुरांसाठीचा सुका चारा (गवत) तसेच भूभागावरील वन्यजीवसृष्टीची अपरिमित हानी होत असते. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास रणरणत्या उन्हात लागलेला वणवा देखील भयानक अक्राळविक्राळ स्वरुपाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या वणव्यामुळे महाराष्ट्र मिलिट्री स्कूल परिसरामधील मागील दहा वर्षापासून जोपासलेली चिकू व आंब्याची झाडे व आयुर्वेदिक वन औषधी झाडे या लागलेल्या आगीत जळून गेली आहेत.

बघा व्हिडिओ

महाराष्ट्र मिलिट्री स्कूलचे संचालक रणजित सावरकर यांनी शाळेवरील उपस्थित कर्मचारी वर्गाच्या मदतीने वणवा विझविण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले, पण वणव्याचा आवाका इतका प्रचंड होता की, उपल्ब्ध साधनक्षमतेत त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होते. वारंवार लागणाऱ्या या वणव्याचा बंदोबस्त करण्यासाठी व आग नियंत्रणात आणण्यासाठी भविष्यात वन विभागाकडून व शासकीय यंत्रणेकडून यावर उपाययोजना आखण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. अन्यथा पुढील काळात दुर्मिळ आशा वनाऔषधी वनस्पतींसोबतच दुर्मिळ आशा जीवसृष्टीच्या ऱ्हास झाल्या शिवाय राहणार नाही. या करिता कायमस्वरूपी उपाययोजना आखणे ही काळाची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here