Chandigarh University: अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने 8 जणींनी उचलले टोकाचं पाऊल

पंजाबच्या मोहालीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोहालीतील एका विद्यापीठात रात्री उशीरा परिस्थिती अनियंत्रित झाली होती. एका विद्यार्थिनीने आंधोळ करताना इतर विद्यार्थिनींचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे लक्षात येताच विद्यापीठातील ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न करत टोकाचे पाऊल उचलले.

(हेही वाचा – 70 वर्षीय आईच्या मरणानंतर केली इच्छा पूर्ण आणि केले अवयवदान)

मिळालेल्या माहितीनुसार, मोहालीतील चंदीगड विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आंघोळ करताना ६० जणींचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. ही विद्यार्थीनी हे व्हिडिओ शिमला येथे राहणाऱ्या एका मुलाला पाठवत होती आणि तो मुलगा ते व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. या प्रकरणानंतर व्हिडिओ समोर आल्यानंतर ८ जणींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थीनीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या घटनेनंतर शनिवारी उशीरा विद्यापीठाच्या गेट क्रमांक २ वर विद्यार्थांनी निदर्शने करून गोंधळ घातला. यावेळी शेकडो विद्यार्थी इथे जमले आणि जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलीस आल्यानंतर व कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे विद्यार्थी शांत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एमएमएस बनवणाऱ्या तरूणीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी विद्यार्थिनीची ओळख पटली असून वसतिगृहात विद्यापीठ प्रशासनाने इतर विद्यार्थिनींसमोर तिची चौकशी केली. विद्यापीठ प्रशासनाच्या चौकशीत विद्यार्थिनीने सांगितलं की, ती बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवत होती. ज्या मुलाला ती हे व्हिडिओ पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या तरूणीविरूद्ध एफआयआर नोंदवला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here