सध्या सर्व शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर जात आहेत. मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या आनंदात बाधा येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune highway) प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
(हेही वाचा – Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ११ वाहने एकमेकांवर आदळली)
मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार २९ एप्रिल रोजी पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune highway) वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे. शनिवार, रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शनिवार २९ एप्रिल रोजी भल्या पहाटेपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम झाला आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरातील महामार्ग पोलिसांनी दहा- दहा मिनिटांचे ब्लॉक घेत वाहतूक सुरु ठेवली आहे.
हेही पहा –
पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी
पोलिसांकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे (Mumbai-Pune highway) जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत. त्यामुळे पुणे मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी होत आहे तर मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पुढील तीन दिवस हीच परिस्थिती पहायला व अनुभवायला मिळणार आहे.
Join Our WhatsApp Community