जोहान्स केप्लर (Johannes Kepler) हे जर्मन शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १५७१ रोजी जर्मनीतील वेल डेर स्टॅड येथे झाला. त्यांनी टुबिंगेन विद्यापीठात धर्माचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली. या दरम्यान त्यांनी निकोलस कोपर्निकस यांचे कार्य आणि सूर्यकेंद्री प्रणालीबद्दलच्या त्यांच्या कल्पनांचा अभ्यास केला.
कोपर्निकन सिद्धांताचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नसले तरी केप्लर यांनी जाहीरपणे त्यांची बाजू मांडली. महत्वाचे म्हणजे ल्युथरन आणि कॅथलिक चर्च या सिद्धांताच्या विरोधात असल्याने केप्लर (Johannes Kepler) यांनी खूप मोठा धोका पत्करला होता. केप्लर (Johannes Kepler) यांनी डॅनिश शास्त्रज्ञ टायको ब्राहे यांच्या मदतीने सूर्यमालेचे निरीक्षण केले. या निरीक्षणांद्वारे त्यांनी आपल्या सूर्यमालेतील ग्रहांच्या कक्षेचे वर्णन केले. मंगळाच्या प्रतिगामी गतीकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. केप्लरच्या सिद्धांताने तीन नियमांचे वर्णन केले: कक्षाचा नियम, क्षेत्रांचा नियम आणि सामंजस्यांचा नियम..
(हेही वाचा BJPची महाराष्ट्रात लोकसभेसाठी रणनीती ठरवण्याच्या हालचालींना वेग; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पिंजून काढणार)
त्यांनी ग्रहांच्या गतीचे तीन नियम सांगितले, प्रकाश शास्त्रावरील त्यांच्या कार्यामुळे चष्म्यांचा शोध लागला असे महत्वाचे कार्य त्यांच्या नावावर आहे. त्यांनी आपल्या पहिल्या ग्रंथात गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख केला होता आणि असेही सांगितले की पृथ्वीवरील महासागरांमध्ये भरती चंद्राच्या आकर्षणामुळे होतात. वयाच्या ५९ व्या वर्षी १६३० मध्ये त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community