माथेरान-नेरळ मिनी ट्रेन मार्गावर रेल्वे स्लीपरचा तुकडा; थोडक्यात टळला अनर्थ

135

माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात अज्ञातांनी लोखंडी राॅड ठेवून ट्रेनचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला, आता हा राॅड कोणी ठेवला याबाबत शोध सुरु असून मात्र येथील लोको पायलटच्या सतर्कतेमुळे माथेरान मिनी ट्रेनचा अपघात टळला आहे. याबाबत अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत. अज्ञातांविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.

मागच्या तीन वर्षांपासून बंद असलेली नेरळ- माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत पुन्हा दाखल झाली आहे. दिवसभरात अप व डाऊन अशा चार फे-या होतात. माथेरानमध्ये सध्या प्रत्येकी सहा डब्यांच्या तीन मिनी ट्रेन असून त्या डिझेल इंजिनावर धावतात.

( हेही वाचा: “…तर बुधवारपर्यंत मी राजीनामा देईन”, असं का म्हणाले अब्दुल सत्तार? )

घटनेची चौकशी केली जात आहे

रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता माथेरान- नेरळ अशी मिनी ट्रेन घाटातून जात असतानाच, या मार्गावर रेल्वेचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. हा तुकडा म्हणजे रुळांखाळी वापरण्यात येणारा लोखंडी स्लीपर्स होता. हा तुकडा पाहताच मिनी ट्रेनचे लोको पायलट दिनेश आणि सहायक लोको पायलट सुधांशु यांनी प्रसंगावधान दाखवून मिनी ट्रेन थांबवली. हा तुकडा त्वरित बाजूला करत या घटनेची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाला दिली. त्यानंतर गाडी पुढे रवाना करण्यात आली. या घटनेची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.