ई- रिक्षा पुन्हा सुरु करण्यासाठी माथेरानकरांनी पुकारला बंद

ई- रिक्षाच्या समर्थनार्थ शुक्रवारी माथेरान बंद पुकारण्यात आला आहे. ई- रिक्षा पुन्हा सुरु करण्याची मागणी माथेरानकरांनी केली आहे. प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी ई-रिक्षा सुरु करण्यात आली होती. ती मुदत 4 मार्चला संपल्याने ई-रिक्षासेवा बंद करण्यात आली होती. मात्र- ई-रिक्षा पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी माथेरानकरांनी शुक्रवारी बंद पुकारला आहे. माथेरानमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. माथेरानमधील श्रीराम चौकातून अधीक्षक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे.

( हेही वाचा: विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र झाल्या तर प्रशासन सज्ज; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती )

172 वर्षांनी माथेरानमध्ये ई- रिक्षा

माथेरानमध्ये गेल्या दीडशे वर्षांपासून म्हणजे ब्रिटीशकालापासून वाहतुकीसाठी हात रिक्षाचा वापर केला जात होता. ही हातरिक्षा माणसांकडून ओढली जात होती, या अमानवी प्रथेविरोधात एका सामाजिक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. अखेर याचिकेच्या संदर्भात निर्देश देताना सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमध्ये ई- रिक्षाची चाचणी करण्याची परवानगी दिली. त्यामुळे वाहनबंदी असलेल्या माथेरानमध्ये तब्बल 172 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ई-रिक्षा सुरु झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here