गेल्या काही दिवसांपासून असह्य झालेल्या काहिलीत आता घामाच्या धारा चांगल्याच सतवणारा अनुभव देतील. मुंबईतील शहर भागात कामानिमित्ताने भर दुपारी फिरणाऱ्या चाकरमान्यांना हा दाहक अनुभव येईल. अगोदरच एप्रिल महिन्याच्या अखेरच्या दिवसांत असह्य झालेली तापमानवाढ वाढत्या आद्रतेमुळे अजूनच सतावेल. मुंबईत बुधवारी कमाल तापमान 36 अंश सेल्सियसवर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई उपनगरात आद्रता 61 तर शहर परिसरात 71%
काल सोमवारी कमाल तापमान 34.9 अंश सेल्सियसवर नोंदवले गेले होते. त्या तुलनेत आजचे कमाल तापमान दोन अंशाने जास्त असेल. मुंबई उपनगर परिसरात आद्रता 61 तर शहर परिसरात 71 टक्के नोंदवली जात आहे. मानवी शरीराला 60% इतपत आद्रता सहन होते. त्यामुळे सतत उन्हाच्या संपर्कात असणाऱ्यांनी डोके टोपी किंवा कापड्याने झाकणे सध्याच्या दिवसांत फारच गरजेचे आहे.
(हेही वाचा – मनसे सज्ज! औरंगाबाद सभेपूर्वीच पुण्याहून मागवले ५० हून अधिक भोंगे)
डॉक्टरांनी केले आवाहन
या दिवसांत शरीरातील पाणी पटकन कमी होते. सतत तहान लागते. म्हणून सतत पाणी बाळगा. ताक आणि लस्सीचे सेवन करत राहा. गरज नसल्यास दुपारी चार वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community