मुंबईत कोसळल्या पावसाच्या हलक्या सरी

दक्षिण मुंबईत बुधवारी दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र मुंबईत शनिवारनंतर थेट बुधवारी पडलेल्या पावसामुळे आता तापमान वाढले आहे. मुंबईत, गुरुवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

तापमानात वाढ 

सांताक्रूझ येथे २८.५ अंश सेल्सिअस आणि कुलाब्यात २७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद बुधवारी करण्यात आली. सरासरीच्या तुलनेत दोन्ही ठिकाणी किमान तापमानवाढ दोन ते तीन अंशाने नोंदवली जात आहे.

( हेही वाचा : राज्यात २३ नवीन संवर्धन राखीव, ५ अभयारण्यांची निर्मिती)

बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या नोंदीनुसार, कुलाब्यात कमाल तापमान ३३.२ तर किमान तापमान ३४.५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहील आणि हलका पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here