पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचा जन्म ३१ मे १७२५ साली महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड नावाच्या तालुक्यातल्या एका चौंडी नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. अहिल्याबाईंच्या वडिलांचं नावं माणकोजी शिंदे असं होतं. ते चौंडी गावचे पाटील होते. माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला वाचायला आणि लिहायला शिकवलं होतं. (Ahilyabai Holkar)
अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) या मल्हारराव होळकर यांच्या सुनबाई होत्या. अहिल्याबाईंच्या पतीचं नाव खंडेराव होळकर असं होतं. खंडेराव होळकरांना कुम्हेरच्या लढाईत वीरमरण आलं. त्यांच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकरांनी अहिल्याबाईंना (Ahilyabai Holkar) सती जाऊ दिलं नाही. माळवा प्रांताचा कारभार मल्हारराव पाहू लागले. पुढे बारा वर्षानंतर त्यांनाही देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताचं साम्राज्य अतिशय कुशलतेने सांभाळलं. (Ahilyabai Holkar)
लॉरेन्स नावाच्या इंग्रजी लेखकाने अहिल्याबाईंची (Ahilyabai Holkar) तुलना रशियाची राणी ‘कॅथरीन द ग्रेट’, इंग्लंडची राणी ‘एलिझाबेथ’ आणि डेन्मार्कची राणी ‘मार्गारेट’ या तिघींशी केली आहे. या लेखकाने अहिल्याबाईंना (Ahilyabai Holkar) भारताची ‘कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट’ असं म्हटलं आहे. याव्यतिरिक्त तो असंही म्हणाला होता की, ‘ज्या वेळी जगातल्या सर्वांत महान महिलांचा इतिहास लिहिला जाईल, त्या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचं नाव सर्वांत आधी घेतलं जाईल.’ (Ahilyabai Holkar)
(हेही वाचा- Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या! ३४ प्रकरणात दोषी, तरीही निवडणूक लढवणार ?)
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) या योग्य न्याय करण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतात अनेक मंदिरं उभारली, नद्यांवर घाट बांधले. एवढंच नाही तर भारतातल्या प्रसिद्ध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. लोकांना रोजगार मिळावे म्हणून त्यांनी औद्योगिक धोरणं आखली. जीर्णोद्धार केलेल्या देवळांमध्ये प्रामुख्याने काशी, उज्जैन, द्वारका, त्र्यंबकेश्वर आणि परळी वैद्यनाथ यांचा समावेश आहे. गुजरातमधलं सोमनाथ मंदिर गझनीने उध्वस्त केलेलं होतं. त्याच्या शेजारीच अहिल्याबाईंनी एक शंकराचं मंदिर बांधलं. सोमनाथ दर्शनासाठी येणारे लोक या देवळातही दर्शनासाठी जातात. अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आपल्या प्रजेसाठी कायमच योग्य आणि कल्याणकारी असंच काम करत होत्या. (Ahilyabai Holkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community