महापालिकेत उण्याचे देणे: प्रशासनाला आपल्याच निर्णयाचा विसर

164

उद्यान, मैदानांसह मनोरंजन मैदानांच्या देखभालीसाठी काढण्यात येणाऱ्या कंत्राट कामांसाठी मागवण्यात आलेल्या निविदांमध्ये उणे ३० ते ३६ टक्के अर्थात अंदाजित दरापेक्षा कमी बोली लावून काम मिळवणाऱ्या कंपन्यांच्या निविदा रद्द करून त्यांची इसारा रक्कम जप्त करणाऱ्या उद्यान विभागालाच आता आपल्याच निर्णयाचा विसर पडला आहे. पाच उद्यान व मैदानांच्या नुतनीकरणासह सुधारणा करण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राट कामांमध्ये चक्क सरासरी उणे ३५ टक्क्यांपर्यंत बोली लावत कामे मिळवली आहेत आहे. त्यामुळे जे प्रशासन ३० टक्क्यांच्या खाली बोली लावली म्हणून इसारा रक्कम जप्त करते, तेच प्रशासन उणे ३५ टक्क्यांच्या खाली काम मिळवत असताना त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना कामे देण्याची शिफारस करत आहे. त्यामुळे महापालिकेला उण्याचे देणे असल्याचे स्पष्ट होत आहे.

कंत्राटदाराने आकारला उणे ३४.०७ टक्के एवढा दर 

मुंबई महापालिकेच्या उद्यान कक्षाच्या माध्यतातून एच पश्चिम येथील पाली हिल,संत ऍनेस चर्च आणि खेरवाडी येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाची सुधारणाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बहुउद्देशीय कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट आणि बॅडमिंटन कोर्ट तयार करणे आदींसह इतरक कामे केली जात आहे. यासाठी कनक कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर २.७० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रशासनाने यासाठी ४.१३ कोटींचा अंदाजित खर्च गृहीत धरला होता, त्यातुलनेत कंत्राटदाराने उणे ३६.९९ टक्के दर लावला आहे. तर के पूर्व विभागातील सहार व्हिलेजमधील सहारा टँक मैदानाचा विकास, मरोळ व्हिलेजमधील कुंती पार्क उद्यान, चकाला गावातील मैदानाच्या विकासाची कामे प्रशासनाने हाती घेतली आहे. यामध्ये गझेबो, फुटबॉल कोर्ट, मुलांना खेळाच्या जागेची निर्मिती, खुली व्यायाम शाळा आदींसह इतर कामे केली जाणार आहे. यासाठी रनुजा देव कार्पोरेशन ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी २.७१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यामध्ये प्रशासनाने ३ कोटी ९५ लाख रुपयांचा अंदाजित खर्च गृहीत धरला होता. त्यातुलनेत कंत्राटदाराने उणे ३४.०७ टक्के एवढा दर आकारला आहे.

(हेही वाचा – कुर्ला-कलिना रस्त्यावरील मिठी नदी पूल अर्धवट, तरीही ९.६६ कोटींनी वाढला खर्च!)

तीन महिन्यांपूर्वी महापालिका उद्यान विभागाने उद्यानांच्या देखभालीसाठी मागवलेल्या निविदेमध्ये कंत्राटदारांनी उणे ३० ते ३६ टक्के दर आकारला होता. त्यामुळे उद्यान विभागाने निविदाच रद्द करत यासाठी कंत्राटदारांनी भरलेली इसारा रक्कम जप्त केली होती. परंतु आता त्याच उद्यान विभागाच्यावतीने उणे ३५ टक्क्यांच्या कंत्राटदारांनी बोली लावून काम मिळवले आहे. त्यांना काम देण्याची शिफारस उद्यान विभागाने स्थायी समितीपुढे करत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. त्यामुळे उद्यान विभागाची नेमकी भूमिका काय हाच मुळी प्रश्न उपस्थित होत आहे.

संत ऍनेस चर्च, पाली हिल क्रीडांगणाचे नुतनीकरण

खेरवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुधारणा

  • अंदाजित किंमत : ४ कोटी १३ लाख रुपये
  • कंत्राट किंमत : २ कोटी ७१ लाख रुपये
  • कंत्राटदार कंपनी : कनक कंस्ट्रक्शन
  • कंत्राट टक्के : उणे ३६.९९ टक्के

सहारा व्हिलेज सहार टॅक येथे मैदानाचा विकास

मरोळ व्हिलेज, मिलेटरी रोड कुंती पार्क उद्यानाचा विकास

चकाला गावमधील मैदानाचा विकास

  • अंदाजित किंमत: ३ कोटी ९५ लाख रुपये
  • कंत्राट किंमत : २ कोटी ७१ लाख रुपये
  • कंत्राट कंपनी : रनुजा देव कार्पोरेशन
  • कंत्राट टक्के : उणे ३४.०७ टक्के

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.