‘मी सावरकर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ५ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम

158

सर्वसामान्य जनतेला वीर सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, त्यांचा इतिहास आणि त्यांचे विचार याविषयी माहिती देण्यासाठी बुधवार ५ एप्रिल रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे ‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य लढ्यातील धगधगतं कवित्व… जाज्वल्य हिंदुत्वाचे तेजस्वी विचारमंथन ‘मी सावरकर’ असे या कार्यक्रमाचे वर्णन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील १७ पैकी १२ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश )

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. भाजपा आमदार अ‍ॅड. आशिष शेलार हे कार्यक्रमाचे विशेष अतिथी आहेत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, श्रीधर फडके यांची सन्माननीय उपस्थिती असेल. तसेच डॉ. संजय उपाध्ये आणि शरद पोंक्षे यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

‘मी सावरकर’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे करतील तसेच संगीत संयोजनाची जबाबदारी प्रशांत लळीत यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे संयोजन मेरक इव्हेंट्सने केले आहे. भरत बलवल्ली, नंदेश उमप, अजित परब, वैशाली सामंत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या गायकांचा कार्यक्रमात सहभाग आहे.

अधिक माहिती…

  • कार्यक्रम – मी सावरकर
  • प्रवेश – विनामूल्य प्रवेशिका सावरकर स्मारक येथे उपलब्ध
  • दिनांक – ५ एप्रिल २०२३, सायंकाळी ६ वाजता
  • स्थळ – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.