४ डिसेंबर या दिवशी ती. सौ. यमुना विनायक सावरकर (माई) यांची जयंती आहे. या निमित्ताने ती. सौ. यमुना विनायक सावरकर (माई) यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने ‘स्मरण त्या तिघींचे’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याअंतर्गत यंदा सौ. सरस्वतीबाई ऊर्फ यशोदा गणेश सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) लाडकी परमआदरणीय येसूवहिनी (Yamunabai Savarkar) यांच्या असीम त्यागाच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा…)
समिधा, पुणे यांची प्रस्तुती
रविवार, ८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘स्मरण त्या तिघींचे’अंतर्गत ‘मी… येसूवहिनी’ या हृद्य सांगितिक अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मी… येसूवहिनी’ ही समिधा, पुणे यांची प्रस्तुती आहे. याची संकल्पना, गीतगायन संगीता ठोसर यांचे आहे, तर संहिता लेखन डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी केले आहे. अभिवाचन वीणा गोखले, संजय गोखले आणि विनोद पावशे यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रधार दिलीप ठोसर हे आहेत. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
सावरकर कुटुंबियांचा आधारस्तंभ असलेल्या ‘त्या तिघी’
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकर कुटुंबाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव), (Swatantryaveer Savarkar) गणेश दामोदर सावरकर (बाबाराव) आणि डॉ. नारायण दामोदर सावरकर (बाळ) या त्रिवर्ग सावरकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचे मोल दिले. हे तीनही क्रांतीसूर्य तेजाने तळपत असले, तरी या तिघांच्याही मागे अगदी प्रथमपासून एक वीरांगना कायम खंबीरपणे उभी होती आणि ती म्हणजे सौ. सरस्वतीबाई ऊर्फ यशोदा गणेश सावरकर म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची लाडकी परमआदरणीय येसूवहिनी (Yashoda Ganesh Savarkar)! त्यांच्यासोबतच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई आणि डॉ. नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई सावरकर यांचेही योगदान अतुलनीय आहे. ८ डिसेंबर या दिवशी ‘मी… येसूवहिनी’ या अभिवाचनातून कै. सौ. यशोदा गणेश सावरकर (Yamunabai Savarkar) यांचा परिचय करून देण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community