मुंबईत गोवरच्या साथीमुळे दुसरा बळी गेला आहे. एक वर्षाच्या गोवरबाधित मुलाचे मूत्रपिंड खराब झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. सोमवारी दुपारी तीन वाजता हा मृत्यू झाला होता. मात्र पालिकेने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
(हेही वाचा – … आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार लंडनला गेली!)
याआधी राजावाडी रुग्णालयात गोवरचा पहिला बळी गेल्यानंतर पालिका आरोग्य विभागने मुंबईत गोवंडी तसेच नजीकच्या परिसरात गोवरची साथ आल्याचे जाहीर केले. गेल्या आठवड्यापासून मुंबईत गोवरची साथ आली असून, लहान मुलांमध्ये ताप आणि पूरळ येत असल्याचे दिसून येताच गोवरचे संशयित रुग्ण म्हणून पाहिले जात आहे. ६ रुग्ण ऑक्सिजनवरही असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. तर ताप आणि पूरळ दिसून आलेले तीन रुग्ण पंधरावर्षांपुढील असल्याचेही दिसून आले आहे.
(हेही वाचा – आरेतून तिसऱ्यांदा बिबट्याला पकडले; आता पुढे काय?)
पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेबाबत पाहणी करण्यासाठी खास दिल्लीहून आलेल्या केंद्रीय तसेच राज्य आरोग्य विभागाच्या पथकानेही लसीकरण मोहीम वाढवण्याच्या सूचना पालिकेला केली आहे. यासह कस्तुरबा रुग्णालयासह, शताब्दी रुग्णालय तसेच अर्बन हेल्थ सेंटरमध्येही गोवरच्या रुग्णांसाठी खाटा पालिकेने उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सध्या मुंबईत ४ नोव्हेंबरपासून ते १४ नोव्हेंबरपर्यंत ६१ जणांना ताप आणि पुरळ आढळन आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.
वयोगटानुसार ताप आणि पुरळ दिसून येत असलेल्या रुग्णांची संख्या
वयोगट रुग्णसंख्या
० ते ८ ८
९ महिने ते ११ महिने ५
१ ते ४ वर्ष ३१
५ ते ९ वर्ष १४
१५च्या पुढील ३