विनापरवाना गर्भपाताच्या गोळ्या विकल्याप्रकरणी ॲमेझॉन या ऑनलाइन खरेदी पोर्टलविरोधात अन्न व औषध प्रशासनाने वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ॲमेझॉनसह ओरिसा येथील मेडिकल दुकानाच्या केमिस्टविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका औषध कंपनीच्या मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्हविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही बाब तपासांतर्गत असल्याने गोपनीय ठेवली गेल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
( हेही वाचा : उत्तर मुंबईतील या भागांमध्ये गुरुवार, शुक्रवारी पाणीकपात )
कसा पकडला तिसरा आरोपी
अन्न व औषध प्रशासनाने गर्भपाताच्या गोळ्यांच्या विक्री प्रकरणी चौकशी केली असता औषधे ओरिसा राज्यातील मेडिकल दुकानातून ऑनलाइन उपलब्ध झाल्याची माहिती दिली गेली. मात्र मेडिकल दुकानाच्या केमिस्टने आपण गर्भपाताची औषधे ऑनलाइन विकली नसल्याचा दावा केला. ही चौकशी थेट एका औषध कंपनीच्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हपर्यंत पोहोचली. दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. केमिस्टचा जीएसटी आणि पॅनकार्ड क्रमांक वापरुन मेडिकल रिप्रेंझेटीव्हने ऑनलाइन औषधांच्या विक्रीसाठी ॲमेझॉनकडे नोंदणी केली. हा सर्व प्रकार संशयाच्या भोव-यात असल्याचा अन्न व औषध प्रशासनाचा दावा आहे. आपल्या नावे ऑनलाइन विक्री केली जात असल्याचे केमिस्टला कल्पना नसणे, यात फारसे तथ्य नसल्याचा दावा अन्न व औषध प्रशासनाच्या सूत्रांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community