दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला पालिकेने परवानगी दिली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी मनसेकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. कोरोना संकटानंतर मनसेचा दोन वर्षांनी पहिल्यांदाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळावा होणार आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( हेही वाचा : आमदारांना हक्काची घरे मग सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही? )
पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘पाडवा मेळावा’ धुमधडाक्यात पार पाडण्यासाठी वरळी विधानसभेतील वॉर्ड क्र.193 च्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी सभा नुकतीच पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्र.193 चे उप शाखाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. मुंबईत ‘शिवतीर्थावर’ होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी वरळी विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना मार्गदर्शन करताना मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी भाषण केले, ज्यामुळे जमलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
Join Our WhatsApp Community