हसीना आणि नवाब यांच्या बैठकीत नक्की काय झाले? वाचा…

122

संपत्तीचा मोठा हिस्सा लाटण्यासाठी हसीना आपा आणि नवाब भाई यांच्या एकत्रित बैठका झालेल्या होत्या अशी माहिती ईडीने नोंदवलेल्या जबाबात सरदार शाह वली याने म्हटले आहे. या संदर्भात जमिनीच्या मूळ मालकीन असलेल्या मुनिरा गोवाला यांना धमक्या देखील आलेल्या होत्या असेही या जबाबात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना कुर्ल्यातील एलबीएस मार्गावर असलेल्या गोवाला कंपाउंड येथील संपत्ती बेकायदेशीरित्या खरेदी प्रकरणी ईडीने मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अटक आहे. नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे ईडीने न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड कॉपीत म्हटले आहे. यावेळी ईडीने अनेक जणांचे जबाब नोंदवले आहेत, त्यात छोटा शकील याचा मेहुणा सलिम पटेल उर्फ सलीम फ्रुट, हसीना पारकर याचा मुलगा आलिशान पारकर सह सरदार शाह वली याचा जबाब नोंदवला आहे.

( हेही वाचा : किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ यादीतील ‘हे’ आहेत नवे ‘डर्टी’ ! )

संपत्तीचा मोठा हिस्सा लाटण्याचा प्रयत्न

सरदार शाह वली याने टायगर मेमन सोबत शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले होते. १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटात सरदार शाह वली याची महत्वाची भूमिका असून या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. ९३ च्या साखळी स्फोटात त्याला दोषी ठरवण्यात आलेले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली आहे. ईडीने सरदार शाह वली खान याचा पीएमएलए ५० अनव्ये मनी लॉन्डरिंग प्रकरणात जबाब नोंदवलेला आहे. त्याने ईडीला दिलेल्या जबाबात नवाब मलिक आणि हसीना पारकर हे संपत्तीचा मोठा हिस्सा लाटण्याचा प्रयत्न करीत होते तसेच मुनिरा यांना काही धमक्या आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांना संपत्तीमध्ये रस उरला नाही, त्यामुळे या दोघांना ही संपत्ती ठेवण्याची संधी मिळाली होती, नवाब मलिक यांनी मात्र सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स नावाची एक कंपनी ताब्यात घेतलेली होती, ही सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स कंपनी गोवाला कंपाऊंडमध्ये होती.

हा प्रश्न समंजस्याने सोडवण्यासाठी नवाब मलिक, भाऊ अस्लम मलिक आणि हसीना पारकर यांच्यात अनेक बैठका झाल्या, किमान दोन बैठकांमध्ये सरदार शाह वली हे स्वतः उपस्थित होते. हसीना पारकर आणि नवाब मलिक यांनी सलीम पटेल यांना दिलेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीचा वापर करून सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्सच्या भाडेतत्त्वावरील मालमत्तेचे मालकीमध्ये रूपांतर केले जाईल असा करार करण्यात आला होता अशी माहिती सरदार शाह वली खान याने आपल्या जबाबात दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.