राज्यातील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाविरोधात सोमवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातील अधिका-यांनी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेशी चर्चा केली. मात्र सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याने परिचारिकांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिचारिका एकमेकांशी चर्चा करत आपला अंतिम निर्णय घेतील.
( हेही वाचा : मुंबईत आरोग्यसेवा कोलमडणार! १ जून पासून आरोग्यसेविका बेमुदत संपावर)
२ जून रोजी अमित देशमुख चर्चेसाठी बोलावू शकतात
वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री अमित देशमुखांबाबत परिचारिका संघटनांमध्ये आता रोष निर्माण होत आहे. बेमुदत संपाचे निवेदन आम्ही महिन्याभरापूर्वीच दिले. त्यानंतरही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख गेल्या आठवड्यापासून लातूरला आहेत. त्यांनी लातूरला चर्चेसाठी बोलावण्याच्या केवळ चर्चा असल्याची माहिती संघटनेच्या परिचारिकांनी दिली. आम्हांला अद्याप अमित देशमुख यांच्याकडून बोलावणे आलेले नाही. कदाचित २ जून रोजी अमित देशमुख चर्चेसाठी बोलावू शकतात, अशी कल्पना आम्हाला बैठकीत दिली गेली. संप अगोदर मागे घ्या, अशी अट मंत्रालयीन अधिका-यांनी ठेवली. मागण्यांबाबत सरकारमध्ये अनुत्सुकता असेल तर संप मागे घेण्यात अर्थ नाही, असेही परिचारिकांच्यावतीने सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community