मध्य रेल्वे रविवार ६ फेब्रुवारी रोजी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक खालीलप्रमाणे देखभालीचे काम करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत असणार आहे.
डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून या वेळात ब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तर ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
(हेही वाचा – कामावर रूजू होऊ इच्छिणाऱ्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची होतेय फसवणूक!)
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी की ५.२.२०२२ (शुक्रवार/शनिवार) च्या ००.०० तास (मध्यरात्री) ते ७.२.२०२२ (सोमवार/मंगळवार) च्या २४.०० तास (मध्यरात्री) पर्यंत मुख्य मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत केला जाईल. हा मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
Join Our WhatsApp Community