तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक! रविवारी प्रवासाचे नियोजन करण्याआधी हे वाचाच..

दर आठवड्यानुसार यंदाच्या रविवारीही रेल्वेने तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाच्या रविवारी सुटी आहे म्हणून सह परिवार प्रवासाचे नियोजन करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा, अन्यथा तुमचा खोळंबा होईल.

रविवारी उपनगरीय रेल्वे ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीचे काम हाती घेत असते, त्यानुसार रेल्वेने हा मेगा ब्लॉक घेतला आहे.

कुठे असणार ब्लॉक?

मध्य रेल्वे

  • मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि जलद मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)

पश्चिम रेल्वे

  • पश्चिम मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव मार्गावर जलद आणि अप तसेच डाऊन मार्गावर ५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

  • हार्बर मार्गावर सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
  • ब्लॉक दरम्यान पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालण्यात येणार आहे.

मेगाब्लॉक कशासाठी?

रेल्वेची वाहतुक सुरळीत होण्यासाठी मेगाब्लॉक खूप महत्त्वाचा असतो. गेल्या काही वर्षात लोकल गाड्या आणि फेऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रुळ, सिग्नल, ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीची कामे, रुळांखालील खडी नव्याने भरणे अशी नियमित कामे करण्यासाठी रेल्वेला ठराविक वेळासाठी वाहतूक बंद करण्याची गरज असते. रोज वाढलेल्या लोकल फेऱ्यांमुळे मध्य व पश्चिम उपनगरीय रेल्वे मध्यरात्री अडीच ते तीन तासच बंद असते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here