IT क्षेत्रात नोकरीची मोठी संधी; Capgemini मध्ये 60,000 नव्या पदांची भरती

209

तुमचे आयटी क्षेत्रासंबंधित शिक्षण पूर्ण झाले असेल तर तुम्हाला एका नामांकित कंपनी नोकरीची मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर IT क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या तसेच आता सध्या IT क्षेत्रात काम करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जगभरात नामांकित आणि भारतातही अनेक ठिकाणी ऑफिसेस असणारी मोठी IT कंपनी लवकरच या वर्षात तब्बल 60,000 नोकऱ्या देणार आहे. कॅपजेमिनी ही कंपनी 60,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे अशी माहिती कॅपजेमिनी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन यार्डी यांनी दिली आहे.

(हेही वाचा – २ वर्षांनी दुमदुमणार विठुनामाचा जयघोष! असा असणार आषाढी पायी वारीचा सोहळा)

अश्विन यार्डी यांनी पुढे असेही सांगितले की, क्वांटम, 5G आणि मेटाव्हर्स सारख्या अनेक नवीन उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे आणि पुढे जाण्यासाठी मोठ्या वाढीच्या ड्रायव्हर्सची अपेक्षा असल्याने कॅपजेमिनी जागतिक कस्टमरसाठी या तंत्रज्ञानाभोवती उपाय तयार करण्यासाठी लॅब देखील स्थापन करत आहे. आमचे जागतिक स्तरावर सुमारे 3,55,000 कर्मचारी आहोत आणि त्यापैकी निम्मे भारतात आहेत आणि आम्हाला हेडकाउंटमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही या आर्थिक वर्षात इतकी मोठी पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही अश्विन यार्डी यांनी सांगितले आहे.

फ्रान्सची आयटी कंपनी कॅपजेमिनी यावर्षी भारतात बंपर भरती करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षी भारतात जवळपास 60,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. ही संख्या 2021 पेक्षा जास्त आहे. कंपनीचे सीईओ (CEO) अश्विन यार्डी यांचे म्हणणे आहे की, डिजिटल आधारित उपायांची मागणी वाढत आहे. आमच्याजवळ जागतिक स्तरावर जवळपास 3.25 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे भारतात आहेत. नवीन नियुक्त्यांमध्ये प्रेशर हायरिंग आणि लॅटरल टॅलेंटच्या स्वरूपात असतील. यामध्ये 5G आणि क्वांटम सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष दिले जाईल.

कॅपजेमिनीने गेल्या वर्षी एरिक्सन सोबत भागीदारी करून भारतात 5G लॅब लाँच केली. याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे म्हणत 5G उद्योगाला अधिक सेवा देण्यासाठी आम्ही आता काही जागतिक आणि भारतीय सर्विस प्रोवाइडर्ससोबत काम करत आहोत, असे यश्विन यार्डी यांनी सांगितले. 2021 मध्ये कॅपजेमिनीने भारतात चांगली कामगिरी केली. येत्या काही दिवसांत कंपनीचा आउटलूक अधिक चांगला असणार आहे, ज्यामुळे हायरिंग ड्राईव्हला चालना मिळाली आहे. हायरिंगला चालना देण्यासाठी आम्ही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही जात आहोत, असे अश्विन यार्डी यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.