मध्य रेल्वेवर सलग दोन दिवस मेगाब्लॉक!

मध्य रेल्वेवर २५ व २६ जून २०२२ रोजी (शनिवार/रविवार रात्री) रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

  • भायखळा- माटुंगा (शनिवार/रविवार रात्री) जलद मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ४.३० पर्यंत आणि जलद मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ५.४० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५.२० वाजता सुटणारी जलद गाडी भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवली जाईल व वेळापत्रकानुसार निर्धारित थांब्यावर थांबेल.
  • ठाणे येथून रात्री १०.५८ ते ११.१५ पर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायवर्जन

  • मेल/एक्सप्रेस ट्रेन 12051 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवली जाईल आणि रोहा येथे निर्धारित वेळेपेक्षा १० ते १२ मिनिटे उशिराने पोहचेल.
  • 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस आणि 12810 हावडा -मुंबई मेल माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथे सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या रद्द
  • पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here