मध्य रेल्वेवर रविवार दिनांक ५ जून २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर सलग ३ दिवस मेगाब्लॉक)
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
- माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्ग सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 पर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. नियोजित थांबे घेऊन आपल्या गंतव्य स्थानकावर पंधरा मिनिटे उशिराने पोहोचतील.
- सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.
- सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या आणि तसेच सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा सुरू राहतील
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ – खारकोपर दरम्यान उपनगरीय सेवा सुरू राहतील.
हा मेंटेनन्स मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे प्रवाशांना होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community