रविवारी पाच तासांचा मेगाब्लॉक, हार्बर रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे मार्गावर रविवार दिनांक १२ जून २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : 7th Pay Commission : वेतन आयोग बंद होणार? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकारचा नवा फॉर्म्युला)

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील व भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
  • घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणा-या आणि वांद्रे/गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

विशेष गाड्या

ब्लॉक कालावधीत पनवेल-कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) या सेक्शनमध्ये विशेष उपनगरीय ट्रेन चालविण्यात येईल.

हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here