मध्य रेल्वे मार्गावर रविवार २४ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )
मध्य रेल्वे मार्गावर या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
- घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
-
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
(नेरुळ/बेलापूर – खारकोपर रेल्वे मार्ग वगळून) - पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता सुटणाऱ्या गाड्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील रेल्वे गाड्या बंद राहतील.
- पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी तथा ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या बंद राहतील.
- पनवेल- वाशी हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक
View this post on Instagram
विशेष गाड्या
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतील.
- ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
- ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यान लोकल रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावतील.
Join Our WhatsApp Communityरविवारी बाहेर पडताय? 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक!https://t.co/61qMzeMQam#IndianRailway #Railway #CentralRailway #railwayNews pic.twitter.com/CQdPQ9C3Pe
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 22, 2022