मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक! एक्स्प्रेस गाड्यांचेही मार्ग बदलले

89

मध्य रेल्वे मार्गावर रविवार दिनांक १९ जून २०२२ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ५व्या आणि ६व्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : सीएसएमटी-कर्जत रेल्वे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार )

मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

  • ठाणे – कल्याण ५व्या आणि ६व्या मार्गावर सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मेगाब्लॉक
  • कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान खालील एक्स्प्रेस/ मेल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १०-१५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
  • 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 17611 हजूर साहिब नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22160 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस, 12321 हावडा- मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), 12812 हटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
  • 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर एक्स्प्रेस आणि 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर या एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ठाणे आणि दिवा दरम्यान जलद मार्गावर वळवली जाईल.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

  • कुर्ला ते वाशी या हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी करता सुटणाऱ्या आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील गाड्या रद्द केल्या जातील.

विशेष गाड्या 

  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल – वाशी या सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील.
  • ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

हा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.