पुणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यानुसार शहरात नऊ ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल; तसेच सात रेल्वे पुलांची निर्मिती करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. यापैकी चांदणी चौक उड्डाणपूल, सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, नळस्टॉप येथील दुहेरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. या विकासकामांसाठी राज्य सरकारकडूनही निधी मिळवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – आनंदाची बातमी! नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीला भारतातही परवानगी)
शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. एकीकडे ‘मेट्रो’ मार्गांची निर्मिती करण्यात येत असून, दुसरीकडे ‘पीएमपी’ची सेवा दर्जेदार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील वाहतूक कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या ‘बॉटल नेक’ रस्त्यांच्या विस्तारीकरणाची आवश्यकता आहे.
पुणे महापालिकेने दहा वर्षांपूर्वीच सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यानुसार, उड्डाणपूल; तसेच ग्रेड सेपरेटर तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या विकासकामांना म्हणावी तशी गती मिळाली नाही. शहरात वाहतूक कोंडीचा विळखा वाढत असून, ही कोंडी फोडण्यासाठी प्रस्तावित विकासप्रकल्पांचा नुकताच आढावा घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community