भारत आणि अमेरिकेत ‘या’ विषयावर झाला समंजस्य करार!

124

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजेस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांच्यात सप्टेंबर 2021 मध्ये स्वाक्षरी करण्यात आलेल्या समंजस्य कराराबाबत माहिती देण्यात आली.

 या सहकार्यांचा समावेश

चेन्नई येथील आयसीएमआरच्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था (NIRT) येथे मूलभूत, अनुवादात्मक आणि उपयोजित नाविन्यपूर्ण संशोधन, महामारी विज्ञान, औषध, अणु जीवशास्त्र, वैद्यकीय कीटकशास्त्र, रोगप्रतिकारशास्त्र, औषध, सूक्ष्मजीवशास्त्र आणि विषाणूशास्त्र पुरते मर्यादित न राहता उष्णकटिबंधीय संसर्गजन्य आणि ऍलर्जीक रोगांच्या प्रतिबंध, निदान आणि उपचारांच्या तंत्रांवर लक्ष केंद्रित करून सहकार्य केले जाईल. क्षयरोग, परजीवी संसर्ग, एचआयव्ही/एड्स, ऍलर्जीक रोग, इतर उदयोन्मुख आणि पुन्हा उद्भवणारे आजार आणि अन्य रोगांसाठीच्या सहकार्याचा यात समावेश आहे.

कौशल्य आणि क्षमता निर्माण करण्यास मदत

अमेरिका आणि भारत सरकार संसाधनांच्या उपलब्धतेनुसार या सामंजस्य करार अंतर्गत वित्तीय सहाय्य पुरवू शकतात. वैयक्तिक प्रकल्पांना मदत देण्यासाठी उभय देश सरकारी, बिगर -सरकारी, खाजगी क्षेत्र, फाउंडेशन आणि इतर स्त्रोतांकडून आवश्यक आणि नेहमीच्या आणि प्रचलित पद्धतीनुसार,अतिरिक्त निधी आणि सक्रिय सहभाग मिळवू शकतात, भारतीय शास्त्रज्ञ/संशोधक/विद्यार्थ्यांना, नियमांनुसार, आयसीईआर कार्यक्रमातून निर्माण होणाऱ्या सहकार्यात्मक संशोधन प्रकल्पांतर्गत कंत्राटी/प्रकल्प म्हणून नियुक्त केल्यामुळे, त्यांना क्षयरोग आणि इतर क्षेत्रातील विविध तंत्रे/कौशल्य विकास शिकण्यात आणि क्षमता निर्माण करण्यास मदत मिळेल.

( हेही वाचा: महाराष्ट्रातील राज्य विद्युत कंपन्यांच्या पेन्शनचा घोळ! (भाग २) )

पुन्हा नुतनीकरण 

चेन्नईमध्ये इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च (ICER) च्या स्थापनेसाठी 2003 मध्ये भारत-अमेरिका संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आली होती. त्याला 2008 मध्ये मुदतवाढ देण्यात आली आणि 2017 मध्ये पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. आता सामंजस्य करार म्हणून नूतनीकरण करण्यात आले. इंटरनॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स इन रिसर्च ICER चेन्नई येथे आहे आणि NIAID आणि ICMR च्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन ट्युबरक्युलोसिस (NIRT) यांच्यातील भागीदारी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.