लग्नानंतर तब्बल 11 वर्षे पत्नी सासरी गेलीच नाही! न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

142

लग्नानंतर एका नव्या आयुष्याची सुरुवात होते, प्रत्येक जण लग्नानंतर सुखाच्या संसाराची स्वप्न बघत असतो, पण एका नव-याला मात्र आपल्या बायकोपासून घटस्फोट घेण्यासाठी नाईलाजाने न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. त्यामागील कारण ऐकाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

हे कारण देत टाळाटाळ…

रायपूर छत्तीसगढ येथील एक नववधू लग्नानंतर आपल्या माहेरी गेली, ती लग्नाच्या 11 वर्षांनंतरही सासरी परतली नाही. तिने कारण देताना घरी परतण्यासाठी शुभ मुहूर्त नाही, असे सांगून टाळले, त्यानंतर लग्नाला 11 वर्षे उलटूनही पत्नी माहेरीच राहिली. पत्नीला आणण्यासाठी पती बिचारा सतत तिच्या माहेरी जात राहिला, पण सासरी येण्यासाठी शूभ मुहूर्त नसल्याचं सांगत ती पतीला परत पाठवत राहिली. अखेर वैतागून पतीने न्यायासाठी न्यायालयात धाव घेतली.

फक्त 11 दिवसाचा झाला संसार

अपीलकर्ता संतोष सिंह यांनी यापूर्वी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती, मात्र ही याचिका फेटाळली गेली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. याचिकेनुसार, संतोष सिंहचा जुलै 2010 मध्ये विवाह झाला होता. तो 11 दिवस आपल्या पत्नीसोबत राहिला. त्यानंतर पत्नीचे कुटुंबीय आले आणि काहीतरी महत्त्वाचं काम असल्याचं सांगून महिलेला आपल्यासोबत घेऊन गेले. यानंतर पतीने तिला तिच्या माहेरून सासरच्या घरी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा शुभमुहूर्त नसल्याचं सांगत पत्नीने येण्यास नकार दिला.

( हेही वाचा :कोरोनाबाधित आहात तर परस्पर खाजगी रुग्णालयात जाऊ नका! कारण…)

न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

याप्रकरणात आता छत्तीसगड उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश जारी केला आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि रजनी दुबे यांच्या खंडपीठाने असं निरीक्षण नोंदवलं की शुभमुहूर्त हा कुटुंबाच्या आनंदासाठी असतो. मात्र महिलेनं याचा अडथळा म्हणून वापर केला आहे. त्यामुळे हिंदू विवाह कायद्यांतर्गत न्यायालयाने हे लग्न मोडीत काढलं आहे. घटस्फोटाच्या आदेशाला हिंदू विवाह कायद्याच्या कलम 13 (IB) अंतर्गत मान्यता देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.