हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती मर्सिडीज एनआयएच्या हाती… सापडल्या धक्कादायक वस्तू!

स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि आता चक्क मर्सिडीज अशा अनेक गाड्यांची या प्रकरणात एंट्री झाल्याने एकंदरीतच हे प्रकरण म्हणजे एक ‘कार’नामा झाला आहे, असे म्हणावे लागेल.

मनसुख हिरेन मृत्यू आणि अंबानींच्या घराबाहेर सापडलेली गाडी या प्रकरणांत सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. स्कॉर्पिओ, इनोव्हा आणि आता चक्क मर्सिडीज अशा अनेक गाड्यांची या प्रकरणात एंट्री झाल्याने एकंदरीतच हे प्रकरण म्हणजे एक ‘कार’नामा झाला आहे, असे म्हणावे लागेल.

काय आहे गाडीचे धुळे कनेक्शन?

ज्या मर्सिडीज कारमधून मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केला ती आता एनआयने जप्त केली आहे. ही गाडी मुळची धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. ही गाडी सचिन वाझे चालवत असल्याचेही सांगण्यात येत आहे. ही गाडी धुळ्यातील सारांश भावसार यांनी फेब्रुवारीमध्ये विकली होती. याबाबतचे सगळे कागदपत्र आपल्याकडे आहेत, आपण तपास अधिका-यांना पूर्ण माहिती देण्यास तयार आहोत, या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, असे सारांश भावसार यांनी सांगितले आहे. दरम्यान या गाडीचा मालक कोण याचा तपास सध्या सुरू असल्याचे एनआयएकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः वाझेंचा मोबाईल, संगणक एनआयएकडून जप्त! सूत्रधाराचा शोध सुरु  )

सापडल्या अनेक वस्तू

या मर्सिडीज गाडीत अनेक बनावट नंबर प्लेट, एक चेक्सचा शर्ट, पाच लाख रुपयांची रोख रक्कम तसेच नोट काऊंटिंग मशीन, अशा अनेक वस्तू सापडल्या असल्याचे एनआयएचे प्रमुख अनिल शुक्ला यांनी सांगितले आहे. या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागल्याने फार मोठा खुलासा झाला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज छ. शिवाजी महाराज टर्मिनस येथील असून, फुटेजमध्ये हिरेन कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ही मर्सिडीज त्यांच्याजवळ आली व त्यात बसून हिरेन निघून गेल्याचे पहायला मिळत असल्याचे, एनआयएकडून सांगण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here