Meta Layoffs: FB, इंस्टा, व्हॉट्सअॅपमध्ये कर्मचारी कपात सुरू; नोकरी गेलेल्यांना मिळणार इतका पगार

140

ट्विटरनंतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या प्रमुख सोशल मीडिया साइट्सवरही बुधवारपासून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स इंक.चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग यांनीही याला मान्यता दिली आहे.

(हेही वाचा – मनसे आक्रमक; ‘हर हर महादेव’ शो बंद पाडल्यास खळखट्याकचा इशारा)

झुकेरबर्गने एका बैठकीत सांगितले की, काही चुकीच्या निर्णयांमुळे कंपनीची ही अवस्था झाली आहे, ज्यासाठी कंपनी स्वतः जबाबदार आहे. कंपनीच्या कर्मचार्‍यांशी झालेल्या संभाषणात त्यांनी मेटामध्ये सुरू असलेल्या कर्मचारी कपातीवर शिक्कामोर्तब केले आहे. मेटामध्ये सध्या 87,000 कर्मचारी कार्यरत आहेत, त्यापैकी सुमारे 10 टक्के कर्मचारी कामावरून काढले जाण्याची शक्यता आहे. कंपनी ज्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे, त्यांना किमान चार महिन्यांचा पगार कंपनीकडून देण्यात येणार आहे.

फेसबुकची स्थापना 2004 मध्ये झाली. फेसबुकच्या मार्केटमध्ये यावर्षी 500 अरब डॉलरची घट झाली आहे. झुकेरबर्ग मेटा प्लॅटफॉर्म्स इंक ची सुमारे 16.8 टक्के मालकी आहे. कंपनीचे शेअर्स घसरल्याने झुकरबर्गची एकूण संपत्ती या वर्षी 88.2 अरब डॉलरने घसरून 37.2 अरब डॉलर झाली. झुकेरबर्ग एकेकाळी जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर होता, मात्र आता तो 28 व्या क्रमांकावर आल्याचे दिसतेय. सप्टेंबरच्या अखेरीस मेटाचे मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना सांगितले की, मेटा आपला खर्च कमी करणार आहे, त्यासाठी कर्मचारी कपातही करण्यात येणार आहे. पुढे असेही म्हटले की, 2023 मध्ये मेटा आपल्या कर्मचार्‍यांची संख्या 2022 पेक्षा कमी करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.