- ऋजुता लुकतुके
मॉरिस गराज ५ ईव्ही कारने जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत बक्षीसं मिळवली आहेत. नवीन वर्षी ही इस्टेट एसयुव्ही भारतात लाँच होतेय. (MG 5 EV)
एमजी ५ ईव्ही ही मॉरिस गराज कंपनीची पूर्णपणे इलेक्ट्रिक, दीर्घ पल्ल्याची आणि इस्टेट एसयुव्ही प्रकारची गाडी २ जानेवारीला भारतात लाँच होत आहे. युरोपीयन आणि इतर आशियाई बाजारपेठेत ही गाडी आधीच लोकप्रिय ठरली आहे. आणि तिला दोन जागतिक ऑटोएक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. (MG 5 EV)
(हेही वाचा – Khalistani Terrorists In Canada : ही परिस्थिती दोन्ही देशांसाठी धोकादायक; एस जयशंकर यांनी कॅनडाला सुनावले खडे बोल)
हे लोकप्रिय ॲपही गाडीमध्ये मिळणार
एका चार्जमध्ये ही गाडी ४०० किलोमीटरपर्यंत धावते, यात १,३६७ लीटरची बूट स्पेस आहे, १०.३५ इंचांचा मोठा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आहे. आणि आयस्मार्ट ॲप हे ग्राहकांमध्ये लोकप्रिय ॲपही इथं आहे. शिवाय या गाडीत आहे पार्किंगच्या वेळी उपयोगी पडेल असा ३६० अंशांचा कॅमेरा. (MG 5 EV)
शिवाय या कारमध्ये आहे एमजी पायलट ही प्रणाली. चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली खूप उपयुक्त आहे. ही प्रणाली, गाडीसमोर एखादा पादचारी किंवा सायकल चालवणारा आला तर तातडीने ब्रेक दाबते. रस्त्यावर मार्गिका बदलली तर गाडीतील दिवाही पेटतो. आणि वेग नियंत्रणाच्या पलीकडे असेल तर आवाजही होतो. गाडी रहदारीत अडकली असेल तरी ही प्रणाली चालकाला तशी कल्पना देते आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही दाखवते. (MG 5 EV)
(हेही वाचा – गुलाबाच्या पाकळ्यांचा आरोग्यदायी लाभ)
युरोपीयन बाजारात ही गाडी लाँच झाली तेव्हाचा तिचा पहिला लूक या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता, (MG 5 EV)
The MG 5 EV has just won Best Large Electric Car for Value and Best Electric Estate in the prestigious What Car? Awards! 🏆 #MG5 #Ev #WhatCarAwards #BestElectricEstate #BestLargeElectricCar pic.twitter.com/Gn2rTJXBGR
— Perrys (@perrysmotors) February 1, 2022
या गाड्यांशी एमजी ५ इलेक्ट्रिक एसयुव्हीची असणार स्पर्धा
एमजी ५ इलेक्ट्रिक एसयुव्हीची दोन मॉडेल आहेत आणि सात रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. गाडीतील चालकासमोरचा टच स्क्रीन १०.२५ इंचांचा आहे. तर बॅटरीची क्षमता ६१ किलोवॅटची आहे. ही गाडी ॲपल कारप्ले आणि अँड्रॉईड कार अशा दोन्ही यंत्रणा सपोर्ट करते. (MG 5 EV)
भारतात या गाडीची स्पर्धा असेल ती टाटा निक्सॉन ईव्ही आणि महिंद्रा एसयुव्ही ईव्ही या गाड्यांशी. पण, या गाड्यांच्या तुलनेत एमजी ५ ची किंमत थोडी जास्त आहे. एमजी ५ ईव्ही भारतात २७ लाख रुपयांपासून सुरू होते. (MG 5 EV)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community