- ऋजुता लुकतुके
भारतीय घटनेत लोकांना रोजगाराचा हक्क बहाल केला आहे. तो लक्षात घेऊन २००५ मध्ये केंद्र सरकारने (Central Govt) ग्रामीण भागातील स्री-पुरुषांना रोजगार मिळवून देण्यासाठी पहिल्यांदा राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणली. सुरुवातीला तिचं नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामाणी रोजगार हमी योजना (MGNREGA Scheme) असं होतं. लोकांमध्ये तिचं लघुरुप मनरेगा जास्त लोकप्रिय झालं. ग्रामाणी भागात राहणारे १८ वर्षांच्यावरील पुरुष व महिला भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (MGNREGA Scheme)
या योजनेचे (MGNREGA Scheme) फायदे काय आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा हे समजून घेऊया, (MGNREGA Scheme)
मनरेगा योजनेचे फायदे
- ग्रामीण भागातील लोकांना रोजगार आणि त्यामुळे नियमित उपजीविकेची साधनं मिळाली.
- ग्रामीण जनतेची क्रय शक्ती वाढून, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्था खेळती राहिली.
- रोजगार योजनांमध्ये ग्रामीण भारताचा सहभाग वाढला.
- भारतीय गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास सुरू झाला.
- भारतातील दुर्लक्षित कामगार वर्ग मुख्य स्त्रोतात आणि औद्योगिक विकासात सहभागी झाला.
- ग्रामपंचायतींचे अधिकार वाढले आणि त्या जास्त सक्षम झाल्या.
- ग्रामीण भारतातील जलस्त्रोत आणि जमिनी यांचा सुयोग्य वापर सुरू झाला. (MGNREGA Scheme)
(हेही वाचा – Pune Local Railway Megablock : रविवारी पुणे-लोणावळा लोकलचा मेगब्लॉक, वाचा वेळापत्रक…)
मनरेगा योजनेत (MGNREGA Scheme) सहभागी होण्यासाठी आधी एक रोजगार कार्ड काढावं लागतं. कार्डच तुमचं रोजगार कार्ड किंवा ओळखपत्रही असतं. आणि या कार्डावर तुमची सर्व माहिती लिहिलेली असते. पुढे जाऊन या योजनेअंतर्गत तुम्ही केलेल्या कामांची नोंदही यात केली जाते. हे कार्ड असेल तरंच मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी अर्ज करता येतो. ग्राम पंचायतींना असं कार्ड काडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे मनरेगा (MGNREGA Scheme) कार्ड काढण्यासाठी आधी तुम्हाला ग्राम पंचायतीमध्येच अर्ज करावा लागेल. तो करताना तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड अशी काही कागदपत्रं तुम्हाला जोडावी लागतात. (MGNREGA Scheme)
अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत मनरेगा (MGNREGA Scheme) कार्ड तुम्हाला मिळतं. ते मिळाल्यावर तुमच्या भागात सुरू असलेल्या मनरेगा (MGNREGA Scheme) कामांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. वर्षाचे किमान १०० दिवस तुम्हाला रोजगार मिळेल अशी हमी या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. आणि मनरेगा (MGNREGA Scheme) कार्डावर तुम्ही केलेल्या कामाची नोंद होत असते. तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतो. (MGNREGA Scheme)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community