अग्निवीरांसाठी एमएचएची घोषणा केंद्र सरकारने अग्निवीरांबाबत आज आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारने बीएसएफमधील रिक्त पदांवर माजी अग्निवीर सैनिकांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यासोबतच उच्च वयोमर्यादेच्या निकषांमध्येही शिथिलता जाहीर करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने अधिसूचनेनुसार याची घोषणा केली आहे.
गृह मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे सीमा सुरक्षा दल कायदा, 1968 च्या कलम 141 मधील उप कलम (2) च्या खंड (b)आणि (C) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन त्याची घोषणा केली. केंद्र सरकारने अधिकारांचा वापर करुन आता सीमा सुरक्षा दल, सामान्य कर्तव्य संवर्ग नियम, 2023 तयार करण्यासाठी सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम, 2015 मध्ये सुधारणा जाहीर केली आहे. जे 9 मार्चपासन लागू होणार आहे.
( हेही वाचा: डॉ. अनिल मिश्र यांना राज्य सरकारच्या हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर )
‘अशी’ असेल सूट
केंद्र सरकारने जाहीर केले की, काॅन्स्टेबल पदाशी संबंधित भागाचे नियम बदलले जातील आणि उच्च वयोमर्यादेत शिथिलतेच्या नोट्स समाविष्ट केल्या जातील. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व तुकड्यांच्या बाबतीत तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाईल.