पदभरतीतील निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) बदनामी प्रकरणी जी. ए. सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना अखेर महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी अदिती लेंभे यांनी हा निर्णय जाहीर केला.
कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
‘म्हाडा’ची परीक्षा घोटाळा एमपीएससी समन्वय समितीने उघडकीस आणल्यानंतर जीए सॉफ्टवेअरचे प्रीतिश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांनतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि इतर घोटाळे उघडकीस आले होते. जी.ए सॉफ्टवेअर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सातत्याने होत होती.
(हेही वाचा – रेल्वे स्थानक परिसरात धूम्रपान करताय? सावधान! नाहीतर…)
अशी झाली होती कंपनीची निवड
म्हाडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’ ते गट ‘ड’ संवर्गातील पदे भरण्यासाठी बाह्य एजन्सीची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परीक्षा घेताना सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार परीक्षा घेणाऱ्या संस्थांची निवड करणार होती. त्या प्रक्रियेद्वारे चार परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यातून जी. ए. सॉफ्टवेअरची नेमणूक केली होती.
Join Our WhatsApp Community