MHADA Konkan Lottery 2023: हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी बुधवारी सोडत

287
MHADA Konkan Lottery 2023: हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी बुधवारी सोडत
MHADA Konkan Lottery 2023: हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी बुधवारी सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांसाठी बुधवारी, सकाळी १० वाजता सोडत निघणार आहे. ४ हजार ६५३ घरांसाठी ही सोडत होणार आहे. ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली म्हाडाच्या या सोडतीचा सोहळा होणार आहे.

(हेही वाचा – मेट्रो-३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

२०२१मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ७ हजार ९८४ घरांसाठी सोडत निघाली होती. त्यानंतर मे २०२३मध्ये कोकण मंडळाच्या ४ हजार ६५४ घरांसाठी सोडत बुधवारी निघणार आहे. या घरांसाठी ८ मार्चपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती, जी १९ एप्रिलला संपुष्टात आली होती. एकूण अर्जांपैकी ४८ हजार ८०५ अर्ज ४ हजार ६५४ घरांसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे या पात्र अर्जांपैकी कोणाच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार हे स्पष्ट होणार आहे.

  • सर्वसमावेशक योजनेतील १ हजार ४५६ घरांसाठी, ४६ हजार १६ अर्ज
  • विरार बोळींजमधील प्रथम प्राधान्य योजनेतील २ हजार ४८ घरांसाठी, ३६९ अर्ज
  • पंतप्रधान आवास योजनेतील ९८४ घरांसाठी, ३५१ अर्ज
  • गृहनिर्माण प्रकल्पातील १६६ घरांसाठी, २ हजार ४३८ अर्ज

ऑनलाईन पहा सोडत

म्हाडा कोकण मंडळाच्या घरांची सोडत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. यासाठी तुम्हाला bit.ly/konkan_mhada या लिंकवर क्लिक करावे लागले. तसेच तुम्हाला सोडतीमध्ये नाव जाहीर झालेल्या विजेत्यांची यादी पाहायची असेल, तर https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर म्हाडाकडून संध्याकाळी ६ वाजता अपलोड केली जाईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.