आता ‘म्हाडा’चे अर्ज ‘या’ मोबाईल ॲपवरून भरता येणार!

143

मुंबईत एक लहानसे का असेना हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने सोडतीची प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोडतीसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारांना म्हाडा संकेतस्थळावर अर्ज भरण्यासोबतच आता मोबाईल अॅपवर घरबसल्या अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – घटस्फोटाचे प्रमाण वाढतेय.. कारणं ऐकून व्हाल थक्क)

अर्जदारांना अर्ज भरते वेळीच पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार असून या कागदपत्रांची छाननीही ऑनलाईन होणार आहे. यामुळे पात्रतेसाठी लागणारा वेळ कमी होणार असून विजेत्याला काही दिवसांमध्येच हक्काचे घर मिळणं सोयिस्कर होणार आहे.

म्हाडाच्या मंडळातर्फे उभारण्यात येणाऱ्या घऱांची विक्री कऱण्यासाठी सोडत काढण्यात येते. या सोडतीला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळतो. सोडतीकरता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या अर्ज भरण्यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो. तसेच सोडतीनंतर याच संकेतस्थळावर सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येतो; मात्र आता मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असेही सांगितले जात आहे की, म्हाडा सोडतीचे ॲप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे.

काय आहेत अॅपचे फायदे

  1. सोडतीची जाहिरात या अॅपवर पाहता येणार
  2. योजना क्रमांक, घराची संख्या किती उपलब्ध आहे, हे पाहता येणार
  3. घरबसल्य अर्ज भरता येणार
  4. सोडतीसाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत
  5. एका क्लिकवर सर्व पर्याय उपलब्ध होणार आहे
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.